Uncategorizedचळवळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, अंबाजोगाई येथील घाण हटवा, विटंबना थांबवा, पँथर बसले उपोषणाला

अंबाजोगाई, बीड : ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व शॉपिंग सेंटर अंबाजोगाई इथे होणाऱ्या घानी संदर्भात व अवैध दुकानावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी आज उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले व नगरपरिषदेला निवेदन दिले होते. या निवेदनाला त्यांनी केराची टोपली दाखवली. अद्द्याप कोणतीही दखल त्यांनी घेतलेले नाही. खुलेआम ही महामानवाची एकप्रकार सुनियोजित विटंबना सुरू आहे. त्यामुळे जास्त काळ आम्ही शांत बसणार नाही, प्रशासन गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत लढत राहणार आहोत.

आज ऑल इंडिया पँथर सेनेचे ता.सल्लागार विजय बाबा कांबळे, युवा तालुका अध्यक्ष मंगेश वैद्य, शहर अध्यक्ष करण साळवे हे उपोषणाला बसले आहेत निवेदन देताना, वेळेस बादल कांबळे, अक्षय कांबळे, विजय (बाबा) साळवे l, करण वैद्य होते.
आंबेजोगाई या ठिकाणी बसलेल्या ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आंदोलनाची दखल न घेतल्यास अंबाजोगाई नगर परिषद च्या समोर लवकरच “बोंबाबोंब आंदोलन” केले जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी अशा इशारा सुद्धा बाबा कांबळे यांनी दिला आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष नितीन सोनावणे यांनी सांगितले की, आमचा लढा महामानवाच्या अस्मितेसाठी असून तात्काळ जर प्रशासनाने भूमिका घेतली नाही तर हा लढा जिल्हा व्यापी होईल. पँथर जास्त काळ शांत राहत नसतो याचही प्रशासनाने घ्यावे आणि आमचा अंत बघू नये. स्वच्छता ठेवा, महामानवाचे नाव असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधे दारू विक्री कसे काय होते? ही विटंबना आम्ही खपवून घेणार नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबत करण्याची मागणी सुद्धा आम्ही जिल्हा स्तरावर करणार आहोत असा इशारा त्यांनी दिला आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!