राष्ट्रीय
RSS ला एक्सपोज करताच, संघाचे सगळे डीपी “राष्ट्रध्वज” झाले!

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी काल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर आज एवढा मोठा बदल झाला आहे. हा क्रांतीकारी बदल बघायला मिळाला. मोहन भागवत सहित आरएसएस च्या अधिकृत पेजवर भारताचा ध्वज असलेला डीपी लावण्यात आलेला आहे.
अपेक्षा एवढीच आहे की, ज्या तीन कार्यकर्त्यांनी 2001 ला आरएसएस नागपूर मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकवला होता, त्या क्रांतिकारकांना 12 वर्ष कोर्टाची झुंज द्यावी लागली, त्यांना त्यावेळी जेल झाली. याबद्दल आज तरी संघ त्यांची माफी मागून त्यांचा गौरव करणार आहे की नाही? अशा दुसरा प्रश्न दिपक केदार यांनी ट्विटर फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून विचारला आहे!