राष्ट्रीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील विटंबना रॅपमुळे “उद्रेक”

पुणे : यूट्यूब चॅनेलवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित घाणेरडे रॅप बनवण्यात आले आहे. ते रॅप झपाट्याने वायरल होत आहे त्यामुळे आंबेडकरी तरुणांमध्ये संताप वाढत चालला आहे. देशभर या रॅप विरोधात तक्रारी गेल्या आहेत.

Supremetiwari नामक त्याचं YouTube channel आहे. गायकाचे नाव आलोक उपाध्याय आहे. त्याने अतिशय घाणेरड्या भाषेत हे रॅप बनवले आहे ज्यात महामानवाला शिवीगाळ करण्यात आली आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी कार्यकर्त्यांना राज्यभर निवेदन, पोलीस तक्रार देण्याचे आदेश दिले आहेत. हा व्हिडिओ वायरल न करता त्याच्या पँथर स्टाईल मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिपक केदार यांनी सांगितले. त्याला तत्काळ अटक न झाल्यास उद्रेक होईल असेही मत त्यांनी व्यक्त केले.

देशात पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या विरोधात काही लिहिल्यास तात्काळ अटक होते पण एवढं गंभीर प्रकरण असून संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विटंबना करणाऱ्याला अटक का होत नाही कुठं तरी मनुवादी सत्ता असल्यामुळेच हिंमत करत असल्याचे चित्र दिसत आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!