शहीद भागवत जाधव स्मृतिदिनी दिपक केदार यांची भावनिक पोस्ट!

शहीद भागवत जाधव स्मृतिदिन जयभीम!
रक्ताच्या थारोळ्यात जयभीम म्हणत शहीद झालात, म्हणूनच आज आमच्या माना स्वाभिमानी झाल्या!
जातीयव्यवस्थेविरोधात पँथर बंड पुकारून पँथर चळवळीने समाज सुरक्षीत, स्वाभिमानी करण्यासाठी मनुवादी विरोधात एक अभूतपूर्व युद्ध लढल त्यात युद्धात पँथर शहीद भागवत जाधव या लढवय्या पँथर यांचा बळी गेला. भेकाड, पळपुट्या जातीयवादीने लपून छतावरून पाठा टाकला, पाठा आमच्या वयस्कर आई च्या डोक्यात पडणार एवढ्यात मरण्यासाठी रणांगणात उतरलेल्या पँथर भागवत जाधव याने पाठा स्वतःच्या डोक्यात झेलला रक्ताच्या थारोळ्यात रक्तबंबाळ अवस्थेत पँथर म्हणत होते पुढे चला थांबू नका!
शौर्य गाजवले, युद्ध जिंकले अन् आज पँथर च्या या बलिदानामुळे स्वाभिमानी समाज झाला, सुरक्षीत आई बहीण झाली!
शहीद भागवत जाधव विनम्र अभिवादन!
तुमच्या डोक्यात पाठा घालणारे आम्ही विसरलो नाहीत, तुमच्या रक्तातून सत्ताधारी झालेले जे आज पवित्र झाल्याचे नाटक करत आहेत. त्या रक्तपिपासू हत्याऱ्याना आम्ही विसरलेलो नाहीत. तुमच्या सामाजिक स्वातंत्र्याचा लढा आम्ही लढत राहु…
सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीला जयभीम!