तू महार आहेस, माझ्यामुळे सरपंच झालास म्हणत बौध्द सरपंचाला मारहाण करण्यात आली.

तू महार आहेस, माझ्यामुळे सरपंच झालास म्हणत बौध्द सरपंचाला मारहाण करण्यात आली. नगर जिल्ह्यातील, कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील ही घटना आहे. आज पीडित सरपंच त्यांच्या परिवाराची ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी भेट घेतली. संभाजी सोनावणे हा बौध्द सरपंच आहे त्यांनी गावात चांगले काम सुरू केले आहे. गावगुंड कागद मागायला घरी गेला यावेळी त्यासंदर्भातील संमतीपत्राची पूर्तता नसल्यामुळे सरपंच संभाजी सोनावणे यांनी बेकायदेशीर काम करायला नकार दिला.
यावेळी तू का देत नाहीस, महार आहेस, तुला सरपंच मी केलं म्हणत मारहाण केली, घरी असलेल्या आईला सुद्धा धक्का बुकी केली. जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनतर सरपंच यांच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल झाला. आज चार दिवस झालं आरोपी अटक केलेला नाही. त्यामुळे कुठं तरी पोलीस यंत्रणा राजकीय दबावा पोटी आरोपीला पाठीशी घालत आहे.
आरोपीला येणाऱ्या काही तासात अटक न झाल्यास भूतो न भविष्यती निळा जनउठाव कर्जत मधे काढल्याशिवाय राहणार नाही. डीवायएसपी ने तात्काळ आरोपीला अटक करावे अन्यथा त्यांच्या सुद्धा निलंबन साठी आम्ही लढा देऊ. याद राखा, कुणामुळे आम्ही सरपंच झालो नाही. संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही सरपंच, आमदार, खासदार होतोय. लोकशाहीला गुलाम करण्याचे काम आम्ही होऊ देणारं नाही. राज्यातल्या अनुसूचित जातीच्या तमाम लोकप्रतिनिधींना आव्हान आहे. मानसिक गुलामी झिडकारून टाका तुमच्यासाठी आम्ही मैदानात आहोत.
या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री एवढाच दर्जा सरपंच पदला आहे. शिक्षणमंत्र्याला नुसती शाई फेकली तर 307 दाखल केला येते तर थेट सरपंच ला मारहाण झाली मग 307 का नाही? 353 का नाही? कायदा सर्वांना समान आहे. लोकशाहीत छोटा मोठा राजा राणी कुणी नाही. त्यामुळे तात्काळ गंभीर कलमांखाली आरोपीला अटक करा अन्यथा मोर्चा काढून उत्तर देऊ अशा इशारा देत आहोत.
येथील आमदार निर्दयी आहेत अध्दयाप बौध्द सरपंच ला भेटायला आले नाहीत. आम्ही निषेध करतो!