चळवळ
अनुसूचित जाती स्वतंत्र बचाव आंदोलनाला महाराष्ट्रात सुरवात झाली. मुंबई भिवंडीत ऑल इंडिया पँथर सेनेचे जोरदार आंदोलन….


भिवंडी: राजस्थान मधील शाळेतील हेडमास्टरच्या माठातून पाणी पिल्यामुळे एका विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली त्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आज दिनांक 18 /8/ 2022 महानगरपालिकेच्या पाठीमागच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करन्यात आला व कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आले आहे. सर्व आंबेडकरी युवक आंदोलनाला सहभागी झाले आहेत. ऑल इंडिया पैंथर सेना भिवंडी चे विनोद (भाऊ)आरकडे, तेजस (भाई)पाटेकर, रघुनाथ सोनपसारे, मिरेश उजगरे ,दीपक वाघमारे, अमित कांबळे कंतक बचुटे, सचिन होळकर, राजू बपछेडे, करण गायकवाड, रोहन साळुंखे, लखन शिरसाट, राज वानखडे, आनंद बागुल आदि उपस्थित होते.