Uncategorized
अडाणी मानसपुत्राला गरिबांची जाण आहे का? रोहित पवारांना पत्रकार परिषदेतून टोला!

चिंचवड : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी आज त्यांच्या उमेदवारासाठी प्रेस घेतली यावेळी त्यांनी रोहित पवारांना टार्गेट केलं.
रोहित पवारांचे नाव न घेता केदार म्हणाले, चिंचवड मतदारसंघात एक युवा नेता फिरत आहे. त्यांनी हिंडणबर्ग रिपोर्ट ने आरोप केल्यावर जणू काही आपण अडाणी चे मानसपुत्र आहोत असा पद्धतीने अडाणी ची पाठराखण केली. खरच अडाणी ची चिंता असलेल्यांना गरीबांचे प्रश्न समजत असतील का? असा टोला त्यांनी लगावला.
या बड्या नेत्यांच्या पदयात्रा झोपडपट्टीत का जात नाहीत असाही सवाल त्यांनी विचारला.