राजकारणावर दिपक केदार यांचे मार्मिक उत्तर!

शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीवर नवनीत राणा यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. संभाजी ब्रिगेड ची ताकद आहे पण उद्धव ठाकरे मध्ये दम नाही असे मत त्यांनी व्यक्त केले त्यानंतर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उत्तर देताना मराठी येत नसलेल्या नवनीत रणाची कीव येते अस त्यांनी मिश्किल उत्तर दिले तर दम नाही याचा अर्थ मराठीत अनेक अर्थी असल्याचे बोलत त्यांनी खिल्ली उढवली.
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी फेसबुक, ट्विटर पोस्ट च्या माध्यमातुन समग्र राजकारणावरच विद्रोही टीका केली आहे. त्यांनी आजच्या राजकारणाला जनावरांचा बाजार म्हणत असं होईल असं वाटलं नव्हतं या आशयाची चार ओळींची प्रतिक्रिया त्यांनी पोस्ट केली जी मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
“राजकारण एवढं बदलेल वाटलं नव्हतं,
थेट नेत्यांच्या दमाच मोजमाफ होईल वाटलं नव्हत,
कंबर धरून बोकड विकलं जातं,
राजकारण सुद्धा जनावरांचा बाजार होईल वाटलं नव्हतं!”