चळवळ
#उस्मानाबाद भीमसैनिक बचाव आंदोलन जिल्हा कचेरीत दणाणला पँथर आवाज

आज भिमा कोरेगाव दंगलीनंतर महाराष्ट्रभर भीमसैनिकावर दाखल केलेले गुन्हे स्वतंत्र जी आर काढून रद्द करावे, तसेच तामसा जी नांदेड येथील भीमसैनिकाची निर्दोष मुक्तता करणे बाबत तसेच अनुसूचित जाती जमाती शी निगडित आर्थिक,सामाजिक,शैक्षनिक व इतर मागण्याबाबत मा.जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय हुंबे,युवक जिल्हाध्यक्ष यशपाल गायकवाड, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कसबे, युवक वाशी तालुका अध्यक्ष भागवत शेंडगे, उस्मनाबाद तालुका अध्यक्ष नवनाथ जोगदंड,पृथ्वीराज वाघमारे, अमोल कांबळे, डॉ.प्रतीक सूर्यवंशी इत्यादी पदअधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थितीत होते.