चळवळ
समाजाच्या मूलभूत प्रश्नांसाठी जळगाव जामोद येते उपोषण

जळगाव जामोद : समाजाच्या विविध मागण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेना जळगाव जामोद तहसील कार्यालय समोर उपोषणास बसले आहेत. या आधी अनेक वेळा निवेदन देऊन मागण्यांची दखल घेत नसल्यामुळे अखेर ऑल इंडिया पँथर सेना जळगाव जामोद तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू करण्यात आले आहे. समाजाच्या मूलभूत हक्कांच्या या मागण्या आहेत. रस्ते, पाणी इत्यादी अनेक मागण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेना आक्रमक झालेली आहे.