Uncategorized
वायरल; व्हिडिओमुळे धिंगाणा!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या नुकत्याच गाजलेल्या बंडखोर नेत्या शीतल म्हात्रे व आमदार प्रकाश सुर्वे यांच्या ओपन जीप रैलीतील व्हिडिओ वायरल झाला आहे. शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देऊन विरोधक गटावर टीका केली. हा व्हिडिओ एडिट केला असल्याचे जाहीर करून कार्यवाहीची मागणी केली.
राजकीय क्षेत्रात या व्हिडिओ ने धुमाकूळ घातला आहे. आज दिवसभर याच व्हिडिओची चर्चा सुरू होती, प्रतिक्रिया सुरू होत्या. पप्पी दे पप्पी दे गाण्यावर हा व्हिडिओ वाजतोय त्यामुळे तो गाजतोय.
राजकारणाचा दर्जा किती खालावला आहे आणि या क्षेत्राला जणू कोरोनाच झाला आहे. काही काळ तरी राजकीय क्षेत्रात लॉकडाऊन लावणं गरजचे झाले आहे.