अग्रलेख
हल्ली गाजतायत पप्पी मुके…

बाप बेटे दोन गटात
घेऊन खोके,
एकदम ओके,
रात्री घरी एक पाळणा दोघांचे झोके,
झूम, इन-आऊट, खरं की खोटं?
हल्ली गाजतायत पप्पी मुके,
जनतेचे विचाराने फुटलेत डोके…
बेरोजगारी अफाट
गच्च भरलेत कामगार नाके,
किती सहन करणार
एखादा नेता रोजच एव्हढे धोके,
काहीही असो,
थकत नाहीत दोन गडी
एक बोबड तर दुसरं चांगलं
सकाळ संध्याकाळ मीडियात सुरू आहेत
दोघांचे चौके छके…
- दिपक केदार