Uncategorized

ऑल इंडिया पँथर सेनेच्या मागणीला पुन्हा एकदा यश!

विजय हा सत्याचा, आपल्या एकजुटीचा!

3 स्त्रीरोगतज्ज्ञ नरखेड ग्रामीण रुग्णालयात नियमित होणार. ऑल इंडिया पँथर सेना नरखेड ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या मागणी करिता पिपळगाव वखाजी धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते त्यामुळे सम्पूर्ण शासनाला घाम फुटलेला होता त्यामुळे नरेश दादा अरसडे यांच्या मध्यस्थीने जल समाधी आंदोलन मागे घेऊन मा. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील विजयगड शासकीय निवस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर हे नरखेड ग्रामीण रुग्णालयात लवरातलवकर रुजू करून नियमित करा असे मा. आरोग्यमंत्री सावंत साहेबाना विनंती करण्यात आली होती त्या विनंतीला मान देत मा. सावंत साहेबानी संबंधित वीभागला आदेश देत येणाऱ्या 1 जानेवारी पासून ( 3 ) स्त्रीरोगतज्ज्ञ दोन दोन दिवस नरखेड ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी राहणार त्यामुळे आपल्या सर्वांच्या एक जुटीचा आज पुन्हा विजय झाला आहे .

जिल्हा अध्यक्ष, शुभम गोंडान, शहर अध्यक्ष पवन राऊत नरखेड तालुका पदाधिकारी यांच्या कार्यामुळे ही आरोग्याची चळवळ गतिमान झाली. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी संघटनेचा चेहरा सर्वव्यापी केला असून दलित अत्याचारच नाही तर सर्व समस्यांवर त्यांचा लढा सुरू झालेला आहे. आरोग्य, रस्ते, पाणी, मूलभूत हक्क अधिकार, शिक्षण, विद्यार्थी, मजूर सर्वांच्या मुद्द्यांवर अतिशय तीव्र लढा पँथर देताना दिसत आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!