चळवळ

दौंडवाडी, अंबाजोगाईत पारसे हत्याकांड पीडित परिवाराच्या भेटीला दिपक केदार येणार

बीड : गेल्या आठ दिवसांपूर्वी परळी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत अनुसूचित जातीचे होलार समाजाचे भीमराव पारसे नामक वयस्कर ऊसतोड मजूराला मुकादम अन् त्याच्या सहकाऱ्यांनी जीव जाईपर्यंत मारून दौंडवाडी गावाच्या फाट्यावर फेकून दिले.

दौंडवाडी गावात भयंकर हादरून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेनंतर सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब लावला, जेव्हा कुटुंबाने प्रेत रोखून धरले तेव्हा गुन्हा नोंद झाला. त्यात सुद्धा हत्याकांड झालेला व्यक्ती अनुसूचित जातीचा असून अद्याप अट्रोसिटी ॲक्टचे कलम लावले नाही. आरोपींना अटक केली नाही, तपास सुरू नाही.

बीड जिल्ह्याच्या राजकीय पुढाऱ्यांच्या दबावातून येते कसलीही कार्यवाही होत नाही. कार्यवाही होण्याची तब्बल आठ दिवस वाट बघितली पण पोलिसांनी पूर्णपणे हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

त्यामुळे ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष 06 जानेवारी 2024 ला दौंडवाडी गावात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत. या घटनेमुळे दलित घटकांमध्ये घुसमट असून ऊसतोड मजुरांचे जगणं या मुकादम नावाच्या शोषण करणाऱ्यानी केले आहे.

आरोपी अटक करा, पीडित कुटुंबाला 25लाखांची मदत करा, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या, एट्रोसिटी ॲक्टचे कलम लावावे या मागण्या घेऊन पँथर रस्त्यावर उतरणार आहे.

दलित अत्याचार विरोधात लढणारे हे सर्वात मोठे संघटन आहे त्यामुळे पोलिसांनी भूमिका घेणे त्यांच्यासाठी योग्य राहील. असे मत विनोद भोळे यांनी व्यक्त केले व दौऱ्याची माहिती दिली.

प्रतीनिधी : बीड

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!