Uncategorized

मुंबई पँथर संदेश वाघचौरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव!

मुंबई, 22 मे 2025: ऑल इंडिया पँथर सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संदेश वाघचौरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आंबेडकरी चळवळीचे आक्रमक नेतृत्व, सामाजिक न्यायासाठी सातत्याने लढणारा हा ‘पँथर’ मुंबईत व्यवस्थेला अन्याय आणि अत्याचाराविरोधात प्रश्न विचारणारा ठरला आहे. संदेश वाघचौरे यांनी चळवळीत स्वाभिमान जिवंत ठेवत, मोठा त्याग आणि संघर्ष केला आहे.संदेश वाघचौरे यांनी मुंबईत तरुणांचे भक्कम संघटन उभे करत शेकडो आंदोलनांचे नेतृत्व केले.

गायरान जमिनीच्या प्रश्नांसाठी आझाद मैदानावर गाजलेले आंदोलन असो, किंवा दलित अत्याचाराविरोधात मंत्रालयावर धडक देताना दाखवलेली आक्रमकता, त्यांनी नेहमीच सामाजिक न्यायासाठी पुढाकार घेतला.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी चळवळीला नवी दिशा दिली. हालाखीच्या परिस्थितीतही त्यांनी आंबेडकरी चळवळीचा ‘चौथा परवा’ यलगार पुकारत मुंबईत पँथर सेनेला मजबूत केले.सोशल मीडियावर शुभेच्छांचा पूर, कार्याचा गौरवसंदेश वाघचौरे यांच्या कार्याची दखल घेत आज सोशल मीडियावर त्यांच्या आंदोलनातील छायाचित्रांसह अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत..

यातून त्यांनी तळागाळातील जनतेच्या प्रश्नांसाठी केलेल्या कार्याची महती दिसून येते. महाराष्ट्राचे प्रवक्ते नितीन सोनवणे यांनी संदेश यांचा ‘आधुनिक पँथर’ असा गौरवपूर्ण उल्लेख करत शुभेच्छा दिल्या. ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे यांनी त्यांना ‘सहकारी, मित्र आणि भाऊ’ असे संबोधत, “अन्याय होईल तिथे धावून जाणारा योद्धा” अशी उपमा दिली. महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष बंटी दादा सदाशिव यांनी त्यांना ‘बंडखोर पँथर’ म्हणत विद्रोहाचा विस्फोट काय असतो, हे संदेश वाघचौरे यांच्याकडून शिकले पाहिजे, असे म्हटले आहे. विदर्भाचे अध्यक्ष दादाराव ढोले यांनी संदेश यांना ‘आक्रमक पँथर आणि समाजासाठी धडपडणारे व्यक्तिमत्त्व’ असे संबोधत शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे यांनी आंदोलनातील संदेश यांचे विविध फोटो शेअर करत त्यांच्या कार्याला सलाम केला. तसेच, महाराष्ट्राचे सरचिटणीस जितेश भाई जगताप यांनीही त्यांच्या योगदानाचा गौरव करत शुभेच्छा दिल्या. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनीही संदेश यांच्या कार्याला ‘जय भीम’ देत येणाऱ्या काळात ते नव्या उंचीवर झेप घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

चळवळीतील योगदान आणि भविष्यसंदेश वाघचौरे यांनी मुंबईत ऑल इंडिया पँथर सेनेचे जाळे मजबूत करत सामाजिक न्यायाच्या लढ्याला धार दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने यशस्वी झाली असून, दलित आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या या कार्याला राज्यभरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ‘सामाजिक क्रांतीचा नवा चेहरा’ असे संबोधले आहे.

वाढदिवसानिमित्त संदेश वाघचौरे यांना शुभेच्छा देताना चळवळीतील सहकाऱ्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभकामना दिल्या. येणाऱ्या काळातही ते सामाजिक न्यायासाठी आणि आंबेडकरी चळवळीच्या सशक्तीकरणासाठी नवी झेप घेतील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

जय भीम! जय पँथर!

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!