ठगेश्वर ला अटक करा – दिपक केदार

मुंबई : बागेश्र्वर नामक भोंदू बाबा एक ठगेश्वर आहे. नागपूरवरुन या आधी त्याने पळ काढला होता, अंधश्रद्धा निर्मूलन ने 25 लाखांचे चॅलेंज लावल्यावर तो पळाला होता.
कायद्याच्या राज्यात भोंदूगिरी आता बंद झालेली आहे. विज्ञान हाच आजचा आधार आहे. कुणाच्या मनात काय हे ओळखणारा हा भोंदू सुनियोजित पने दिशाभूल करणारे कार्यक्रम घेऊन गरीब जनतेची आर्थिक लुटमार करत आहे.
नुकतेच त्याने संत तुकाराम महाराज यांच्यावर अतिशय खालच्या स्तराची टिपणी करून अवमान केला होता. संत तुकाराम यांना टार्गेट करणे हे सनातन वैदिक धर्माचा अजेंडा आहे. जाणिवपूर्वक मानवता पेरणाऱ्या संताला अवमानित करण्याचा हा खेळ आहे. याचा ऑल इंडिया पँथर सेनेनी याआधी तीव्र निषेध केला आहे. संत तुकारामाचा अवमान केला म्हणून या प्रवृत्तीला जेलमध्ये टाकले पाहिजे. मुंबईत मिरा रोड येते ज्यांनी त्याला बोलवले त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकले पाहिजे.
भोंदूगिरी असलेली ही प्रवृत्ती आर्थिक लुटमार आणि भडकाऊ भाषण करत आहे. हिंदु राष्ट्र झाला पाहिजे अशा घोषणा सुद्धा अनेक भाषणात त्याने दिल्या आहेत. भारत, भारतीय नागरिक हीच देशाची ओळख आहे. संविधान राष्ट्रात ही हिंदु राष्ट्राची भाषा महणजे आतंकी कृत्य आहे. अशा भोंदुला आतंकी घोषित करून तात्काळ अटक करा अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केली आहे.
ठगेश्वर याचा भाऊ हा जातीयवादी आहे त्याच्यावर नुकताच अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा सुद्धा नोंद झाला आहे. त्यामुळे अशा क्रिमिनल लोकांना महाराष्ट्रात थारा देऊ नये, अशा भोंदूगिरी ला पोलिसांनी आळा घालावा.