Uncategorized

सम्राटचे बबन कांबळे यांचं निधन; सोशल मीडियात दुःखद पोस्ट!

मुंबई : वृत्तरत्न दैनिक सम्राट चे संपादक “बबन कांबळे” यांचं दुःखद निधन झालं. अचानक सोशल मीडिया मध्ये बातमी झळकली की बबन कांबळे गेले. सगळीकडे दुःख व्यक्त झाले, भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. किती काहीही असलं तरी समाजा साठी दिलेलं योगदान समाज विसरत नाही.

सम्राट अत्याचारित घटकांचा आवाज झाला त्याने दलित अत्याचार विरोधात मोठा आवाज केला. बबन कांबळे यांनी क्रांतीचे बीज राज्यभर रोवली. पत्रकारिता कसली ते एक आंदोलनच चालवत होते.नव्या चेहऱ्यांना निर्माण त्यांनी केलं, सम्राट समाजाच्या हक्काचा विचारमंच झाला होता.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी त्यांना क्रांतिकारक पँथर बबन कांबळे यांना जयभीम करत पोस्ट करून काही आठवणींना उजाळा दिला.

जेवखेडा हत्याकांड नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत घुसून सभा उधळून लावलेली मोठी बातमी सम्राट ने प्रसिद्ध केली होती. दत्तात्रय बंडारू विरोधात रोहिथ वेमुला आंदोलन निर्माण केलं त्याची फ्रंट पेज बातमी सम्राट ने केली. नितीन आगे, शिवाजीराव मोघे पुतळ्याचे दहन, इंदु मिल अजित पवार यांची व पृथ्वीराज चव्हाण यांची सभा उधळून लावलेल्या मोठं मोठ्या बातम्या व काही लेख सुद्धा दिपक केदार यांचे प्रसिद्ध केले होते त्यामुळे त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!