मागासवर्गीय आंदोलकांना ऑल इंडिया पँथरचा पाठींबा!

पुणे: समाजकल्याण आयुक्त कार्यालय पुणे येते गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास मागासवर्गीय विद्यार्थी गेली तीन वर्षे जी स्वधार योजना मिळालेली नाही या गंभीर मुद्द्याला घेऊन उपोषण सुरू आहे
काल मी यावर राज्यव्यापी भूमिका घेतल्या नंतर आणि विद्यार्थ्यांच्या रेट्यामुळे तात्काळ 16 मागण्या मान्य केल्या आहेत.
आज ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र सचिव बापूसाहेब लश्करे, पुणे शहर अध्यक्ष नाना ओव्हाळ, पुणे शहर महासचिव कृष्णा आदमाने यांनी भेट दिली पाठिंब्याचे पत्र देऊन समाजकल्याण अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली त्यांना देखील निवेदन सादर केले.
यावेळी त्यांनी आम्ही 16 मागण्या मान्य केल्या असून 20 कोटी तात्काळ जमा केले असल्याची माहिती दिली, 6 कोटी रुपये पुणे जिल्ह्यासाठी जमा केल्याची माहिती त्यांनी बापूसाहेब लष्करे यांच्या शिष्टमंडळाला त्यांनी दिली.
थकीत सर्वच निधी तात्काळ टाकावा आणि यातील सहायक आयुक्तांच्या बदली संदर्भातील मागणीचा मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करणार आहोत.
विद्यार्थ्यांनी केलेली मागणी अतिशय महत्वाची आहे की, राज्याला सामाजिक न्याय मंत्री तात्काळ देण्यात यावा. या मागणीचा सुद्धा तात्काळ गांभीर्याने मंत्रिमंडळाने निर्णय घ्यावा अशी ऑल इंडिया पँथर सेनेची भूमिका आहे.
.लढणाऱ्या या विद्यार्थ्यांना क्रांतीकारी जयभीम!!