सोलापुरात शेकडो कार्यकर्त्यांचा ऑल इंडिया पँथर सेनेत जाहीर प्रवेश!

सोलापूर : ऑल इंडिया पँथर सेनेची नुकतीच सोलापूर येते बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ऑल इंडिया पँथर सेनेत प्रवेश केला. दलित अत्याचाराविरोधात, मनुवादी विरोधात, संविधान वाचवण्याचा लढा खऱ्या अर्थाने ऑल इंडिया पँथर सेनेचे दिपक केदार लढत आहेत. अनुसूचित जातीचे अस्तित्व वाचवण्यासाठी त्यांना साथ देणे काळाची गरज आहे. त्यामुळे आम्ही दिपक केदार यांचे हत मजबुत करण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेत प्रवेश केला असल्याचे सर्वांनी मत व्यक्त केले.
जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत, राजन शिरसाठ महिला जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात हा प्रवेश करण्यात आला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांचा ऑल इंडिया पँथर सेनेत जाहीर प्रवेश झाला आहे.
अमर कांबळे सोलापुर जिल्हा प्रभारी, पंढरपुर सुनिल भोसले जिल्हाकार्याध्यक्ष, करमाळा अजय प्रशाळे जिल्हायुवा महासचिव सोलापुर संतोष गेजगे मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत वाघमारे बार्शी तालुका अध्यक्ष ज्योती कसबे महीला तालुका अध्यक्ष मोहसिन शेख शहर उपाध्यक्ष देविदास मिरजकर शहर संघटक विशेष म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक यात सहभागी आहेत.
यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी व्हिडिओ कॉल द्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आणि लवकरच येतोय तयारीला लागा असे आव्हान केले. एक एक कार्यकर्त्याने दिपक केदार यांच्याशी संवाद साधला.