चळवळ

सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजने बाबत पँथर स्टूडेंट फेडरेशन चे निवेदन….

खामगाव : पँथर स्टूडेंट फेडरेशन च्या वतीने आज दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी सामाजिक न्याय विभागाच्या स्वधार योजनेची रक्कम तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यात वितरीत करण्यात यावी व सामाजिक न्याय विभागासंबंधी इतर मागण्यांबाबत आज खामगाव तहसील मार्फत मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांना निवेदन दिले या मध्ये नऊ मागण्यांचा उल्लेख केला आहे.१) स्वाधार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील रक्कम तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी.२) बऱ्याच विद्यार्थ्यांना गेल्या दीड वर्षांपासून योजनेचा लाभ मिळालेला नाही, यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी.३) स्वाधार योजनेतील किलोमीटरची जाचक अट शिथिल करण्यात यावी.४) स्वाधार योजनेची रक्कम ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी.५) स्वाधार योजनेच्या वितरणामध्ये नियमितता आणावी.६) अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेच्या जागांमध्ये वाढ करून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी २०० जागांकरिता शिष्यवृत्ती लागू करावी.७) पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपमध्ये महागाईनुसार वाढ करण्यात यावी.८) अनुसूचित जातीच्या पदवीधर विद्यार्थ्यांना व्यवसायाकरिता विनाअट कर्ज उपलब्ध करून द्यावे.९) सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहांची संख्या वाढवण्यात यावी.असे निवेदन दिले या वेळी पँथर स्टूडेंट फेडरेशन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष बंटी गव्हांदे,खामगाव शहर अध्यक्ष अजय सारसर,महासचिव कुलदीप राजपुत,उपाध्यक्ष भूषण सावदेकर, सरचिटणीस अभिजित गव्हांदे, सहसर्चीटनिस अभिषेक तायडे,संघटक सुमेध सावंग, सह कार्याध्यक्ष मंगेश बोरुडे, प्रसिद्धी प्रमुख यश सदांशीव, सहसचिव आयुष सुरवळे, साहप्रसिद्धी प्रमुख आनंद लोखंडे,सुमित मोरे, विशाल पाटील, तेजस मोरे, व इतर स्टूडेंट उपस्थित होते.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!