ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने अकोट नगरपरिषद मुख्याधिकारी नगरपालिका यांना निवेदन देण्यात आले..

अकोला : आल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार . महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भाई भोळे विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली..आज अकोट नगरपरिषद मुख्याधिकारी नगरपालिका यांना निवेदन देण्यात आले.. अकोला जिल्हाध्यक्ष परवेज खान यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.. शहरात संपूर्ण घाणीचे साम्राज्य पसरले आहे.. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा उचलण्याचे कॉन्ट्रॅक्ट अमरावती येथील उत्तर आरती कंपनीला दिले आहे. पण कॉन्टॅक्टर नियमानुसार काम करत नाही.. शहराला घाणीचे स्वरूप दिले आहे. याबाबत ची दखल आलं इंडिया पॅंथर सेना अकोला जिल्हा.अधयक्ष परवेज खान यांनी घेतली व मुख्याधिकाऱ्यांना अवगत केले लवकरात लवकर शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेना आंदोलन उभे करणार आहे..आठ दहा दिवस नंतर कचरा उचलण्यात येतो. कोणतीही जनजागृती मोहीम राबविण्यात येत नाही.. नगरपरिषदेच्या काही भ्रष्ट अधिकारी व नगरसेवकांचा कॉन्ट्रॅक्टरावर आशीर्वाद आहे . कचरा उचलला नाही तरीही बिल काढण्यात येतो.. निवेदन देताना.. तालुकाध्यक्ष उमेश तायडे वाजिद खान.. शाकिब उल्ला.एजाज कुरेशी..सोनु आदी कार्यकर्ते उपस्थित होते..