चळवळ
भारतीय बौध्द महासभेच्या महिलांकडून दिपक केदार यांचे धुळे येते स्वागत!

धुळे : लळिंग किल्ला येते ऑल इंडिया पँथर सेनेची सभा संपन्न झाल्यावर धुळे गेस्ट हाऊस येते दिपक केदार राष्ट्रिय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना यांची भेट भारतीय बौध्द महासभेच्या महिलांनी घेतली. येते शेकडो महिलांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या कार्याचे कौतुक केले. आमचे पाठबळ पाठीशी आहे असे ही आश्वासन त्यांनी दिले
यावेळी भिमअनुयायी महिलेसोबत बैठक संपन्न झाली. यावेळी खाजगीकरण, बौध्द महिला सबलीकरण, बौध्द लेणी बचाव, बौध्द आर्थिक क्रांती, भारत बौध्दमय अजेंडा, बौध्दगया बचाव आंदोलन असे अनेक विषयांवर चर्चा झाली.
भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा अध्यक्ष सुनील रामोशी यांच्या नेतृत्त्वात बैठक संपन्न झाली.