चळवळ

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जातीयवादी हल्ल्यात बौध्द महिला जखमी

चामणी, जिंतूर, परभणी येथील ही घटना आहे. वंदना घोंगडे या महिलेच्या तक्रारीवरून अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. आरोपी अद्याप मोकाट आहेत. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 24 तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
डोळे काळे निळे झालेत जातीय गुंडांनी दमदाटी करून बैल सुद्धा ओढुन नेला आहे. बैलाच्या व्यवहारातील 15 हजार रुपये राहिले म्हणून 30 हजाराचा बैल ओढुन नेला. बौध्द महिला जखमी झाली तिला शिवीगाळ करण्यात आली. तिचा विनयभंग झाला. अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला तरीही आरोपी मोकाट आहेत. पीडितांना अद्याप पोलीस संरक्षण नाही. मुलाचा सुद्धा जीव धोक्यात आहे.
24 तासात आरोपी अटक करा, पोलीस संरक्षण द्या. 15 ऑगस्ट आहे, आम्हाला भूमिका घ्यायला भाग पाडू नका.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बौध्द महिला रक्तबंबाळ आहे. आमचं स्वतंत्र कुठंय हा प्रश्न कायम आहे. आम्हाला माणूस म्हणून जगू द्या ही आमची मागणी कायम आहे. भारत माता की जय चा नारा गुंजेल देशभर ही दलित बेटी भारत मातेची बेटी तुम्हाला वाटत नाही
?

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!