Uncategorized

तृतीपंथीय समाजसेविका काली मुसा कादरी यांची ऑल इंडिया पँथर सेनेच्या नाशिक जिल्हा प्रवक्ता पदी निवड!

तृतीपंथीय समाजसेविका काली मुसा कादरी यांची ऑल इंडिया पँथर सेनेच्या नाशिक जिल्हा प्रवक्ता पदी निवड!
महाराष्ट्रातील तसेच देशातील जातीय अत्याचाराला वाचा फोडणारी विद्रोही आंबेडकरी विचारांच संघटन अशी ओळख असलेल्या ऑल इंडिया पँथर सेनेच्या नाशिक जिल्हा प्रवक्ते पदी आज काली मुसा कादरी यांची निवड मा.दिपक भाई केदार राष्ट्रीय अध्यक्ष (ऑल इंडिया पँथर सेना) तसेच प्रविण भाई संसारे नाशिक जिल्हा अध्यक्ष यांच्या आदेशाने करण्यात आली.
महाराष्ट्रातील वाढते दलीत अत्याचार व तृतीपंथीयांच्या वर होणारे अन्यायाच्या घटना दिवंसे दिवस वाढत आहेत;

तृतीपंथीयांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या समाजसेविका अशी काली मुसा कादरी यांची ओळख आहे त्यांच्या लढ्याला यशस्वी पाठबळ मिळण्यासाठी व तृतीपंथींची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी त्यांनी मा. दिपकभाई केदार यांच्या नेतृत्वावर व प्रविण भाई संसारे यांच्या मार्गदर्शनात विश्वास ठेऊन त्यांनी ऑल इंडिया पँथर सेनेत प्रवेश केला आहे.

येवला मुक्तिभुमी येथे हा प्रवेश सोहळा पार पडला गेला याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष प्रविण भाई संसारे व अन्य कार्यकर्ते तेथे उपस्थित होते..
समाजसेविका काली मुसा कादरी यांना पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या..

प्रविण भाई संसारे
नाशिक जिल्हा अध्यक्ष
ऑल इंडिया पैंथर सेना

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!