मरीआई म्हसोबा अंगात आणून घुमणे हा सुद्धा धाडसी खेळच आहे, त्यांनाही खेळाचा दर्जा देणार का ?

येते ज्यांच्या जीवन जगण्या मरण्याचा “खेळ” झालेला आहे, त्यांना आधी नोकऱ्या द्या! धर्मसत्ता धार्मिक खेळाच्या नावाखाली आरक्षण आणि नोकऱ्यांच्या संध्या तयार करत आहेत. एका धर्मापुरता मर्यादित असलेला प्रकार खेळ कसा काय होऊ शकतो, ज्या खेळात इतर धर्मियांना उतरता येणार नाही. खेळाला धर्म असतो का? मग धार्मिक परंपरेला खेळ घोषित करून खेळाला धर्म लावण्याचा खोडसाळपणा आहे. मुस्लिम, बौध्द, खिर्शचन, इसाई, शीख यांच्यावर अन्याय करणारा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. आपल्या कार्यकर्त्यांना लाभ देण्यासाठीची ही योजना आहे. तिचा आम्ही धिक्कार करतो.अनेक वर्षापासून जे खेळातून नोकरीसाठी वेटींग वर आहेत त्यांना तर संधी द्या. ज्यांच्या जगण्या मरण्याचा रोज खेळ सुरू आहे त्यांच्या हाताला काम तरी द्या. सगळ्यांनी मेगा भरतीचा दिंडोरा पिटाळला आधी भरती तर करा. बेरोजगारांना रोजगार तरी द्या, उगाच महाराष्ट्र जुमला जन्माला घालू नका. #AllindiaPantherSena