वाशी मुंबईत जालोर राजस्थान घटनेचा निषेध ऑल इंडिया पँथर सेना करणार!

मुंबई : ऑल इंडिया पँथर सेनेनी राजस्थान राज्यातील जालोर अनुसूचित जातीच्या 9 वर्षीय दलित विद्यार्थ्याची केवळ मुख्याध्यापकांच्या माटातील पाणी पिल्लं म्हणून त्याला मारलं. त्याची हत्या झाली तेव्हापासून देशभर आंदोलने सुरू झालीत. राजस्थान पोलिसांनी पिडीतांना सुद्धा मारहाण केली. एकीकडे अमृत महोत्सव साजरा होत होता आणि दुसरीकडे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याने जातीमुळे झालेल्या हल्ल्यात जीव सोडला होता.
आरोपीला फाशी झाली पाहिजे, आरोपीच्या बाजूने उभा राहिलेल्या जातीयवादी प्रवृतीवर अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही करावी. पिडित परिवाराला 50 लाखांची मदत व एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी. जातीयवादी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात निषेध नोंदविण्यात येणार आहे
ऑल इंडिया पँथर सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संदेश वाघचौरे, नवी मुंबई अध्यक्ष दिपक वंजारे, महिला नवी मुंबई अध्यक्ष सुरेखा कांबळे, नवी मुंबई युवा अध्यक्ष जयेश इंगळे, नवी मुंबई उपाध्यक्ष सतीश भवरे, नवी मुंबई कार्यअध्यक्ष गणेश गायकवाड, मुंबई कामगार नेत्या सुषमा शिंदे यांच्या नेतृत्वात हे निषेध होणार आहे. अशी माहिती दिली आहे.