अण्णाभाऊ साठे अवमान प्रकरणी शंकरराव चव्हाण महाविद्यालयासमोर ऑल इंडिया पँथर सेनेची 26 रोजी निदर्शने….

अर्धापूर : येथील श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे डॉ. शंकरराव चव्हाण प्रबोधन व्याख्यानमाला समिती च्या वतीने दरवर्षी साहित्यसम्राट कॉमरेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धा व व्याख्यान कार्यक्रम आयोजित केले जाते.परंतु शैक्षणीक वर्ष 2022.23 मध्ये ऑगस्ट महिन्यात साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व कार्यावर विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धा व व्याख्यान कार्यक्रम घेणे अपेक्षित होते परंतु महाविधल्याचे प्राचार्य डॉ. के.के.पाटील यांनी सदरील कार्यक्रम घेण्यास टाळाटाळ केली आहे .प्राचार्य के. के. पाटील यांनी जातीय द्वेष भावनेतून सदरील कार्यक्रम आयोजित करण्यास टाळाटाळ केली आहे का ? असा सवाल विद्यार्थी विचारत आहेत. जगातील बलाढ्य साम्यवादी राष्ट्र रशिया यांनी त्यांच्या देशात कॉमरेड अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व तैलचित्राचे अनावरण करून साहित्य सम्राट कॉमरेड अण्णाभाऊ साठे यांच्या सन्मान करीत आहे . परंतु श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा अवमान केला जात आहे. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेना व समविचारी संघटनांच्या वतीने दि.26 सप्टेंबर 2022 रोजी शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर यांच्या कार्यालयासमोर तीव्र निषेध निदर्शने करण्यात येणार आहेत.
निवेदनावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सुरेश सावते, गणेश कांबळे, हर्षवर्धन सरोदे,विकी कागडे,देवा कांबळे, राज गव्हाणे, स्वप्नील सरोदे, क्रांती कांबळे, विकी ढवळे, इरफान शेख, इ. उपस्थित होते.
सुरेश सावते नांदेड जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना.मो.7448243143