जळगांव जा तालुक्यातील ऑल इंडिया पँथर सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न…

जळगाव.जा : ऑल इंडिया पॅंथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक सरसेनापती भाई दिपकजी केदार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनोदजी भोळे,विदर्भ प्रदेश अध्यक्ष दादासाहेब ढोले,बुलढाणा अध्यक्ष प्रकाश भाई धुंदळे,जिल्हा निरिक्षक विजयभाई वानखडे, यांचे आदेशाने जळगांव जा तालुकाध्यक्ष तथा बुलढाणा प्रभारी राहुल भि.वानखडे यांच्या अध्यक्ष ते खाली जळगांव जा तालुक्यातील ऑल इंडिया पँथर सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली.बैठकीमध्ये ३० सप्टेंबर 2022 ला औरंगाबाद येथे आयोजित निळा जन उठाव आंदोलना मध्ये बहुसंख्येने सहभागी होण्याचे ठरले. तसेच तालुका व ग्रामशाखेच्या नियुक्त्या देण्यात आल्या.नविन नियुक्त्या खालील प्रमाणे विजय जुबंळ यांची तालुका कार्याध्यक्ष पदी, दिनेश आगरकर तालुका सरचिटणिस पदी, मनोहर गोरे यांची पि.काळे पं.स.सर्कल प्रमुख पदी, विनोद गुरूदेव यांची तालुका महासचिव पदी, प्रकाश थोर यांची जळगांव जा शहर संपर्क प्रमुख पदी, मनीष पवार यांची जळगांव जा.शहर प्रभारी पदी, दिपक चापके यांची दादुलगांव शाखा प्रमुख पदी, अरविंद ससाने, यांची आडोळ ग्रामशाखा अध्यक्ष पदी, संतोष गवई यांची तालुका कोषाध्यक्ष पदी, पँथर स्टुडेंट फेडरेशन च्या तालुकाध्यक्ष पदी वैभव वाकोडे यांची तर तालुका उपाध्यक्ष पदी रत्नभुषण तायडे यांची नियुक्ती करण्यात आली.सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन व पुढील सामाजिक राजकिय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
बैठकिला तालुक्यातील सर्व महत्वाचे कार्यकर्ते हजर होते.