चळवळ

दिपक केदार लढवय्या पँथरची कोंडी, चैत्यभूमीवर रोखले जातंय! भावनिक पोस्टमुळे खळबळ

जयभीम,
खुप दुःखद अंतकरणाने जाहीर करतोय, माझ्यासहीत सात जणांना चैत्यभूमीवर अभिवादन करण्यास येण्यापासून रोखले जात आहे. महाराष्ट्रात वाढलेली ताकद बघता माझा बळी घेण्याचा सुनियोजित कट आहे. 151 ची नोटीस अंतर्गत रवी सावंत या कार्यकर्त्याला साकीनाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांना विचारल्यास, उत्तर मिळाले की वरिष्ठांचे आदेश आहेत.
माझ्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्यावर्षी जे झालं ते समाजाला दिलेली वागणूक त्यामुळे तो आक्रोश होता, यावर्षी 2 डिसेंबर 2022 ला स्वतः येऊन आढावा घेतला आणि दिलेल्या चांगल्या सोयी सुविधांबद्दल मुख्यमंत्री आणि प्रशासनाचे आभार व्यक्त केले. ठराविक कार्यकर्त्यांना घेऊन अभिवादन करण्या संदर्भात शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला निवेदन सुद्धा दिले पण आज कळतय 151 अंतर्गत आम्हाला बंधन आणले आहे.
कुणाच्या दबावाने हे सुरू आहे याची पुरेपूर जाणीव मला आहे. पुन्हा एकदा मला सुनियोजित रित्या फसवण्यासाठी हा कट आहे. समाज बांधवांना, माझ्या समर्थकांना, सहकाऱ्यांना जाहीर आवाहन करतोय की मी 06 डिसेंबरला चैत्यभूमीवर येणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राज्यात अभिवादन करेल.
माझं काम थांबणार नाही, 06 डिसेंबर नंतर मी अभिवादन करेल, इतिहासात पहिल्यांदा एखाद्या सामाजिक आंदोलकांची अशी कोंडी केली जात आहे. आतून गुदमरत आहे, अभिवादन करू दिले जात नाही, माझ्या समाजाला मला भेटू दिले जात नाही, याच दुःख होतं आहे.
तसाच तेवढ्याच ताकदीने आपल्यासाठी संघर्ष करत राहील.
सर्व भीमसैनिकानी, माझ्या आया बहिणींनी काळजी घ्यावी, गेल्यावर्षी जो संघर्ष झाला त्याचं फलित मला दिसलं, हाच माझा विजय आहे. यावेळी ज्या काही सोईसुविधा दिसत आहेत, त्या गेल्या वर्षीच्या आक्रोशाचे फलित आहे.
मला अभिवादनापासून रोखले म्हणून मी पोलिसांना कसलेही चॅलेंज करणार नाही, हा दिवस चलेंज करण्याचा नाही, त्यामुळे सर्वांनी सयंम राखावा हे जाहीर आवाहन मी करत आहे!
सर्व भीमसैनिकाना माझा जयभीम!
¶ ट्रेन असेल, येताना जाताना काही अडचणी आल्या तर संपर्क करा.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

  • दिपक केदार
    राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!