अग्रलेख

बिंबिच्या देठापासून

क्रांतीचा एल्गार पुकारत आलोय,

मनुवाद्यांविरोधात लढत आलोय,

सर्वच स्तरावर संघर्ष पदोपदी

तरी डौलात निघालोय,

थांबायचं नाही ठरलंय

निळा झेंडा खांद्यावर घेऊन निघालोय,

नवनिर्मितीची सवय माझी

ती कधीच थांबवणार नाही,

या रस्तावर मरण आले तरी चालेल

लढणं, बिंबिच्या देठापासून ओरडणं

थांबवणार नाही,

समाजाच्या रक्षणाचा, मूलभूत प्रश्नांचा लढा तीव्र

करत निघायचय…

आज गरज “भीम पँथर्स” ची

नव्याने लढण्याची धमक

निळ्या रक्तात आमच्या…

निळ्या रक्ताच्या “भीम पँथर्स” ची

सेना उभा करतोय…

साथ द्या!

#Panthers

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!