फिलोशिपसाठी ओबिसिंचे लेकरं आमरण उपोषण करत आहेत, ऑल इंडिया पँथर सेनेनी दिला पाठींबा!

छत्रपती संभाजी महाराज नगर : महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या फेलोशिप मिळणे या मागणीला, उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्याना आज ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते तथा मराठवाडा अध्यक्ष अमोल उर्फ बंटीदादा सदाशिवे यांनी संघटनेच्या वतीने आज जाहीर पाठिंबा दिला.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधक व प्रशिक्षण संस्था नागपूरच्या वतीने विद्यार्थ्यांना संशोधनासाठी फेलोशिप जाते. त्यामध्ये संशोधक विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी महाज्योती विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने संशोधन विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण छत्रपती संभाजीनगर येथे सुरू आहे.
विद्यापीठ नोंदणी दिनांक पासून फेलोशिप मिळालीच पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी. विद्यार्थी रात्रं दिवस उपोषण करत आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहोत. सरकारला धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमावर 13 कोटी उधळायला आहेत, गो सेवा आयोगाला 164 कोटी देण्यास आहेत पण ओबीसी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फिलोशीप देण्यास निधी नाही हे दुर्दैव आहे. आम्ही लढत राहू शिक्षण हिसकावून घेणाऱ्या व्यवस्थेचा खरा चेहरा जनतेपुढे आणू असे मत यावेळी सदाशिवे यांनी व्यक्त केले.
यावेळी औरंगाबादचे युवा नेते राहुल मकासरे हे सुध्दा उपस्थित होते.