दोन नेते एकत्र दिसताच, राजकीय क्षेत्रात खळबळ!

पुणे : आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद हे पुणे दौऱ्यावर असताना ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार आणि त्यांची भेट झाली. 25 मिनिटं दोघांची भेट झाली आहे. भेटी दरम्यान महाराष्ट्रातील सामाजिक, दलित अत्याचार इत्यादी अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे दिपक केदार यांनी पोस्ट टाकून जाहीर केले आहे. भेटीचे फोटो सुद्धा त्यांनी फेसबुक वॉलवर शेअर केले आहेत.
फोटो वायरल होताच राज्यभर ते तरुणांच्या स्टेट्सवर दिसू लागले आहेत. आंबेडकरी चळवळीत एकच चर्चा सुरू झालेली आहे. चंद्रशेखर आझाद उत्तरप्रदेश मध्ये जातीय अत्याचार विरोधात लढत आहेत तर 1972 च्या दलित पँथर चा आदर्श घेऊन दिपक केदार ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून संघर्ष करत आहेत समाजाच्या रक्षणाची भूमिका घेत आहेत.
दोन्ही मोठ्या युवा नेत्यांची भेटीमुळे राजकीय क्षेत्रात सुद्धा खळबळ माजली असून येणाऱ्या काळात हे दोन नेते एकत्र आले आणि राजकीय भूमिका घेतली तर नवं चित्र निर्माण होऊ शकते. कारण आज मिडियाचे लक्ष नसले तरी दिपक केदार यांची महाराष्ट्रात तरुणाची सर्वात मोठी ताकद आहे. तीच खरी भीमशक्ती आहे. मिडिया जो बागुलबुवा उभा करत आहे.
दिपक केदार, चंद्रशेखर आझाद यांची गळा भेट तुफान वायरल झाली आहे. Instagram वर या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. येणाऱ्या काळात या दोन नेत्यांच्या भूमिकेकडे आंबेडकरी चळवळीचे लक्ष लागलेले आहे.