केवळ निळ्या झेंड्याचाच तिटकारा का ? पँथर बंटी दादा सदाशीवे …..

ऑल इंडिया पँथर सेना मराठवाडा अध्यक्ष बंटी दादा सदाशिवे यांनी तात्काळ औरंगाबाद पहाडसिंगपुरा भागातील भीम अनुयायाना घेऊन निळा झेंडा काढल्याची, महिलांशी अभद्र वागणुकीची, विद्यार्थी, वृध्द, महिलांना पोलीस गाडीत कोंबल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांना केली आहे. जिल्हाधिकारी मनपा अधिकारी यांची भेट घेऊन त्यांनी अन्यायाची माहिती दिली. अनेक झेंडे औरंगाबाद आहेत केवळ निळ्या झेंड्याचाच तिटकारा का अशा प्रश्न करत. तात्काळ झेंडा लाऊन द्यावा व समाजावर झालेल्या अन्यायातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी त्यांनीं केली.काही तासात पुन्हा औरंगाबाद महानगरपालिका पोलिसांचा मोठा फौज फाटा घेऊन पाहाडसिंगपुरा येते रात्री बसवलेला झेंडा काढण्यासाठी गेले आहेत. आज आमच्या अस्मितेला उध्वस्त कराल याद राखा तोंडावर निवडणूका आहेत वॉर्डात जातीयवादी प्रतिनिधींना फिरू देणार नाहीत. अधिकाऱ्यांनी अती करू नये, समाज घाबरलेला आहे, कुणाला काही झाल्यास राज्यभर त्याचे पडसाद उमटतील याची दखल घ्यावी