चळवळ
संविधान गौरव सभा पालममध्ये दिपक केदार फोडणार डरकाळी

परभणी : पालम शहरात संविधान गौरव सभा होणार असून या सभेला ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार येणार असून सभेची जोरदार चर्चा पालम परभणी भागात सुरू आहे.
आमचं अस्तित्व संविधान असून संविधान वाचवणे हाच आमचा लढा आहे. आमचा आधार संविधान आहे, आमची शान संविधान आहे. संविधानाचा जागर करण्याच्या उद्देशाने ऑल इंडिया पँथर सेना सभा घेत आहे. सभेला राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार संबोधित करतील तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे असतील. अशी माहिती आयोजक ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा अध्यक्ष निवृत्ती वाघमारे यांनी दिली आहे.