नमुना 8 अ साठी 25000 रुपये वसुलीचा ग्रामपंचायतीचा ठराव रद्द करा – ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी

तुळजापूर : तालुक्यातील अणदूर ग्रामपंचायत कडुन अणदूर येथील सर्वे नं. 774 येथील राहत असलेल्या जागेची नोंदी आजच्या गायत झालेल्या नाहीत अशा नोंदी लावण्यासाठी मा. ग्रामपंचायत अणदूर यांनी. दि. 30/03/2022 रोजी असा ठराव घेतला कि रुपये 25000/- रोख देतील त्याच्या नावे ( 01 ) व 1/2 अर्धा गुंठा साठी 15000/- रुपये देतील त्यांच्या नावे घराच्या नोंदी किंवा राहत असलेल्या परंतु त्या घराच्या नोंदी नाहीत अशा नोंदी होण्याकरीता मा. ग्रामपंचायत ठराव पास केला असून सदरचा ठराव रुपये 25000/- हजार रक्कम रोख घेऊन घराची नोंद घेणार असल्याचा ठराव हा कायदेशीर नसून बेकायदेशीर आहे. अणदूर ग्रामपंचायत हि बेकायदेशीर ठराव घेणारी महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत आहे, नावे नसलेल्या जागेची नोंद करण्यासाठी रुपये 25000/- घेऊन ज्याची नावे 8 अ नाहीत अशा लोकांकडून रुपये 25000/ घेऊन बेकायदेशीर पणे पैसे घेऊन 8 अ रजिस्टर नोंद केली जात आहे हि कोणत्या कायद्यात बसते यांचे उत्तर ग्रामसेवक यांनी अणदूर येथील जनतेला द्यावे व सदरील पैसे घेऊन झालेल्या नोंदी व होत असलेल्या नोंदी तात्काळ रद्द करून घेतलेले जनतेचे पैसे परत करावे व सादर नोंदी या कारदेशीर पणे करण्यात याव्यात असे निवेदन अणदूर येथील नागरिक आणि ऑल इंडिया पँथर सेना तर्फे देत आहोत सदरचा ठराव तात्काळ रद्द करून सदरील रुपये 25000/- ( पंचवीस हजार रु ) घेण्याचा ठराव रद्द करून तसे जाहीर प्रगटन अणदूर ग्रामपंचायत मध्ये लावण्यात यावा. अणदूर ग्रामपंचायतला हि नम्र विनंती सदरील नेवेदनाचा विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेची आहे..
या वेळी तालुका महासचिव दयानंद कांबळे व युवक तालुका उपाध्यक्ष महादेव जेटीथोर. मिलिंद गायकवाड. भारतीय पॅन्थर सेना. लक्ष्मण गायकवाड लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष हे उपस्तीत होते