मुखेड : ऑल इंडिया पॅंथर सेनेची महत्वपूर्ण बैठक संपन्न!

मुखेड : (नांदेड) – दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष माधव दादा भालेराव यांच्या उपस्थितीत मुखेड येथे पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीत तालुक्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी “गाव तिथं शाखा” या धर्तीवर संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच समाजावर होत असलेल्या अन्याय-अत्याचारांविरोधात आक्रमक भूमिका घेण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी सक्षम झाला पाहिजे, यावरही भर देण्यात आला.
बैठकीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली :सुनिल खंडू कांबळे – सचिव, मुखेडजगदीश सुभाष कांबळे – तालुका उपाध्यक्षप्रेम अशोक कांबळे – मुक्रामाबाद सर्कल अध्यक्षधनाजी बाबुराव बोयवार – मुक्रामाबाद शहर अध्यक्षबुद्धभूषण रामराव कांबळे – मुक्रामाबाद शहर उपाध्यक्षअमोल माधवराव बोयवार – मुक्रामाबाद सर्कल सचिव
या बैठकीस AIPS जिल्हा नेते सुरेश भाई सावते, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सागर भाऊ वानकर, तसेच AIPS नांदेड टिम आणि मुखेड टिम मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी तालुका अध्यक्ष राज लष्करे कलंबरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.



