चळवळ
काळेवाडीत आज ऑल इंडिया पँथर सेनेची जाहीर सभा!

चिंचवड : विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळीचा शेवट होत आला आहे. किशोर आत्माराम काशीकर यांच्या प्रचारासाठी ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या नेतृत्वात जाहीर सभा होत आहे.
आज 23 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता राजवाडे लॉन्स, काळेवाडी, पिंपरी, पुणे येते ही सभा संपन्न होणार आहे. या सभेत दिपक केदार प्रस्तापित भांडवलदारांवर हल्ला चढवणार आहेत. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे यांनी सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.