चळवळ

चिंचवड विधानसभेत औरंगाबाद लोकसभेची पुनरावृत्ती होणार!

चिंचवड : निवडणुकी गाजणार आहे. ऑल इंडिया पँथर पुरस्कृत अपक्ष उमेदवार किशोर आत्माराम काशीकर यांची चर्चा मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी झोपडपट्टी च्या विकासाचा मुद्दा उचलून धरत झोपडपट्टी भागात भावनिक, अस्मिता, अस्तित्व याला धरून प्रचार केल्यामुळे मताला पैसे वाटले तरी मतदान समाजाचा उमेदवार याच धर्तीवर होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रस्तापित समूहाकडे पैसा आहे, केदार यांच्याकडे संघर्षाचा लढा केलेला डेटा आहे त्यामुळे समाज भावनिक झाला असून सगळीकडे बॅट चिन्हांची चर्चा सुरू झालेली आहे.

अशीच परिस्तिथीती औरंगाबाद लोकसभेला झाली होती. हर्षवर्धन जाधव यांच्या भूमिकेत काही उमेदवार असल्यामुळे एकगठ्ठा शोषित, पीडित घटकांचे मतदान किशोर काशीकर यांना पडल्यास ते थेट इम्तियाजजी जलील यांच्या रोलमध्ये येऊन विजयी झालेली असतील.

औरंगाबाद पॅटर्न चिंचवड पॅटर्न होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. आंबेडकरी समाज स्वाभिमानाला महत्व देतो, त्याला गुलामी आवडत नाही. काही नसले तरी चालेल पण गुलामगिरी त्याला आवडत नाही. पाठिंब्याच्या भूमिकेमुळे समाजात चीड आहे, आम्ही किती काळ हे पाठींबा धोरण अवलंबायचे? हा प्रश्न समाजात पडला आहे. शेवटी आता स्वाभिमानी बॅट च असल्याचे बोलले जात आहे. चिंचवड पॅटर्न ब्ल्यू पॅटर्न म्हणून राज्यात राजकीय क्रांती होणार.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!