चळवळ
भीमसैनिक बचाव आंदोलनाच्या तयारीची बैठक!

बुलढाणा : ऑल इंडिया पॅंथर सेना किनगांव जट्टू येते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच 29 जुलै 2022 या रोजी भिमसैनिक बचाव राज्यव्यापी आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी किनगाव जट्टू पॅंथर टीम भुमराला पॅंथर सावरगांव पॅंथर बीबी पॅंथर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी चर्चा करून रूपरेषा ठरविण्यात आली. तसेच भुमराला येथील दिपक भाई केदार यांचे कट्टर समर्थक अक्षय कारभारी म्हस्के यानी ऑल इंडिया पॅंथर सेना मध्ये जाहीर प्रवेश केला. त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिति म्हणून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाई हिवाळे उपस्थित होते.