सावधान : शाळेत वाटप होतंय रामायण, जागरूक भिमवाघिण मीनाक्षी बोर्ड यांनी केली धर्माची शाळा एक्सपोज…

दहिसर : ऑल इंडिया पँथर सेनेची दहिसर प्रमूख मीनाक्षी ताई बोर्डे यांच्या फेसबुक वॉलवर एक व्हिडिओ आहे. ज्यात त्यांनी माहिती दिली की आमच्या मुलाला शाळेत रामायण दिलं जातं. मला कुणाच्या धर्माच्या भावना दुखवायच्या नाहीत पण जर का मी आई आहे तर प्रश्न विचारणारच. या व्हिडिओमध्ये त्यांचा मुलगा सुद्धा अतिशय जागरूक पणे या पुस्तकातील कहाणी वर प्रश्न चिन्ह उपस्थित करतो. विज्ञान किती प्रबळ आहे आणि कथा कशा खोट्या असतात हे यातून समजते. त्यामुळे या जागरूक अनुयायांना जयभीम!
सावध व्हा, हिंदु राष्ट्र निर्मितीचा अजेंडा हा शाळेतून सुद्धा राबवला जातोय. शाळा ही धर्मनिरपेक्ष असली पाहिजे. विद्यार्थ्या मधे धार्मिक भेदभाव निर्माण होईल, इतर धर्मीय विद्यार्थ्यांवर जाणिवपूर्वक धर्म लादण्याची ही प्रक्रिया आहे त्याचा आम्ही निषेध करतो. मीनाक्षी ताई बोर्डे यांनी उचललेलं पाऊल राज्यव्यापी झालं पाहिजे असे मत राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केले.