रामी येथे स्वतंत्र दिनानिमित्त ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने महात्मा फुले यांची प्रतिमा भेट……


धुळे: रामी ग्रामपंचायत या ठिकाणी ध्वजारोहण करत असताना सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक अंगणवाडी कर्मचारी तसेच ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वतंत्र दिनानिमित्त ऑल इंडिया पँथर सेना धुळे तालुका अध्यक्ष राकेश महाले यांच्या कडून जिल्हा परिषद मराठी शाळा रामी या शाळेला ऑल इंडिया पँथर सेना तर्फे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. यावेळी उपस्थित ऑल इंडिया पँथर सेने कडून सर्वांना स्वतंत्र दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ऑल इंडिया पँथर सेना धुळे जिल्हा अध्यक्ष सागर मोहीते, युवा अध्यक्ष राकेश महाले, धुळे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब बडसाने, जिल्हा महासचिव आनंद अमृतसागर, शिनखेडा युवक अध्यक्ष, समाधान मंगळे, सुशील रामराज्य, विशाल वाघ, आकाश घोडे, पुरुषोत्तम केदार आदी उपस्थित होते…..