चळवळ

मानवतेला काळींबा फासणारी घटना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार…..

#हेच_आहे_का_स्वातंत्र्य?

कन्नड: तालुक्यातील खेडा आठेगाव येथे आई सोबत मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत क्रुर घटना घडली आहे. सहा आरोपींना अटक झाली असून त्यातील एक अल्पवयीन आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी ही घटना घडली आहे. आमचा फक्त देश स्वातंत्र्य झालाय परंतु आम्हाला अजूनही जगण्याचे स्वातंत्र्य मिळालेले नाही हेच भयान वास्तव या घटनेतून स्पष्ट होते. गाय मारली तर बातमी होते पण आमची माय मारली तर साधी दखलही घेतली जात नाही. प्रत्येक दिवशी आमच्यावर ठिकठिकाणी अन्याय अत्याचार होतो. सत्ता भोगणारा एकही राजकारणी घटनास्थळी भेट देत नाही. आरोपींना फक्त अटक होणे म्हणजे न्याय नाही. सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सर्वच्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, पिडित मुलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, पिडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेऊन मुलगी मोठी झाल्यावर तिला शासकीय नोकरी मिळावी, पिडित कुटुंबाला संरक्षण मिळावे या व अश्या अनेक मागण्या घेऊन ऑल इंडिया पॅंथर सेनेतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष आद. दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वाखाली लवकरच आंदोलन केले जाईल. पिडितेला न्याय मिळत नाही तोपर्यंत न्यायालयीन लढ्यात ऑल इंडिया पॅंथर सेना पिडित कुटुंबासोबत राहिल. ऑल इंडिया पॅंथर सेनेतर्फे मी सदर घटनेचा जाहिर निषेध करतो.

कवी- निलेश पवार ऑल इंडिया पॅंथर सेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष, जळगाव.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!