चळवळ

बंगाली कॅम्प पंचशील बौद्ध विहार जवळील अतिक्रमण तात्काळ हटवा अन्यथा उग्र आदोंलन

चंद्रपूर शहर ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांतिभूमी व परिवर्तन भुमी म्हणून ओळखल्या जाते. कारण चंद्रपूर शहरात धर्मांतर करुन लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दिक्षा दिक्षा दिली. मात्र या क्रांतिभूमीत बौद्धाची विहारं येथील प्रशासनाकडून दुर्लक्षित झाले असून काही ठिकाणी मद्यपींनी उन्माद मांडला आहे. यात बौद्ध विहार हे परिवर्तन केंद्र मानल्या जाते परंतु याच ठिकाणी जर विहाराचे विडबंन होत असेल तर ही प्रशासनातली मोठी शोकांतिका आहे. असा घणाघात ॲाल इंडिया पँथर सेनेने केला असून बंगाली कॅम्प डि.आर.सी.हेल्थ क्लब जवळील पंचशील बौद्ध विहार परिसरात असलेली अवैद्य दुकाने तात्काळ हटविण्याची मागणी मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन आंदोलनाची चेतावनी दिली आहे.
महानगर पालिका हद्दीत येणाऱ्या डि.आर.सी. हेल्थ क्लब जवळ पंचशील बौद्ध विहार आहे. मात्र या बौद्ध विहार परिसरात मोठ्या प्रमाणावर मुख्य रस्त्यावर लागून अनेक अवैद्य दुकाने चालू आहेत. काही चहाटपरी सुद्धा आहेत. परंतु या टपरी व इतर दुकानात मद्यपी दारु पिण्यासाठी येत असतात. तिथेच दारु पिऊन खाली बाटल्या मात्र बौद्ध विहारात फेकल्या जातात. आणि हेच मद्यपी विहार वालकंपाऊड वरुन आत शिरुन शौच्छ व बाथरूम करुन मोठ्या प्रमाणावर गंदगी करीत आहेत. यातून मात्र विहाराचे विडबंन होत असल्याचे वास्तव चित्र निर्माण झाले असून बौद्ध अनुयायांच्या भावना दुखावल्या जात आहेत. या गंभीर बाबींची दखल घेऊन मनपा प्रशासनाने तात्काळ तेथील अतिक्रमण हटवून विहाराचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करावे. अशी मागणी ॲाल इंडिया पँथर सेनेने केली आहे.
मनपा आयुक्तांना निवेदन देतांना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रुपेश निमसरकार, सल्लागार भैय्याजी मानकर, जिल्हा युवा महासचिव विनोद मेश्राम, जिल्हा महासचिव खेमचंद मेश्राम, चंद्रपूर शहर महिला अन्यक्षा वंदनाताई गेडाम, वैशाली रामटेक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!