Uncategorized

ऑल इंडिया पँथर सेनेचा उमेदवार हा समाजाचा उमेदवार

पुणे : 205, चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत ऑल इंडिया पँथर सेनेनी उमेदवारी दाखल केली. आंदोलक किशोर आत्माराम काशीकर यांनी आज उमेदवारी अर्ज भरला यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार, महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, महाराष्ट्र सरचिटणीस जितेश जगताप यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी बोलताना केदार यांनी सांगितले, आमचा उमेदवार समजाचा उमेदवार आहे, बौध्द समूहाने एक गठ्ठा मतदान केले तर सहज उमेदवार निवडून येतो. संविधान वाचवण्यासाठी आणि धर्मसत्ता गाडण्यासाठी आम्ही मैदानात उतरलोय. कोण कधी मनुवादी घटकांचा हस्तक होईल सांगता येत नाही हे आम्ही आता ओळखले आहे. भाजप हटाव हा केवळ ढोंगी नारा विरोधक देतात, भाजपला हटवण्यासाठी एकमेव आंबेडकरवादी विचाराचा घटक प्रामाणिक पणे काम करताना दिसतो म्हणून आंबेडकरवादी, मानवतावादी, संविधानवादी उमेदवार आम्ही रिंगणात उतरवला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड भागात बौध्द घटकांचे शोषण सुरू आहे. ठराविक जातीच्या लोकांचा विकास झाला असेल आमचं काय? आजही आम्हाला घर नाहीत, हाताला नीट काम नाही, आमच्या तरुणाचे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट शोषण करत आहे. गुन्हेगारी बेरोजगारी मुळे वाढली आहे त्याला राज्यकर्ते जबाबदार आहेत. त्यामुळे निळा झेंड्याच्या राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी आम्ही मैदानात आहोत.

सर्वात आधी ऑल इंडिया पँथर सेनेनी उमेदवारी अर्ज भरला होता. आता आमच्या स्वाभिमानी आंदोलक समजाच्या उमेदवाराला संविधान वादी पक्ष म्हणनाऱ्यानी पाठींबा द्यावा अशी आम्ही मागणी सुद्धा केली आहे. किशोर काशीकर एक आंदोलक आहे. आंदोलक रस्त्यावर मरायला आणि फक्त जेलमध्ये जायलाच आहे का? तो जेलमध्ये जात असेल समाजासाठी तर समाजासाठीच विधानभवनात सुद्धा जाणार आता आयत्या बिळावर नागोबा हे आम्ही खपवून घेणार नाहीत. कुणीही समाजाला गृहीत धरू नये, आता समाजजागृती झालेली आहे. मत विकले नाही तर विजय आमचा निश्चित आहे.

राजकीय गुलामगिरी आपण सोडली पाहिजे. सालगडी होण नाकारले पाहिजे आणि स्वार्थ सोडून सामूहिक कल्याणाचा अजेंडा राबवला पाहिजे ही आमची भूमिका आहे.

असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले!

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!