चळवळ
राजगृहाला झेड दर्जाची आधुनिक सुरक्षा द्या – दिपक केदार

पुणे : राजगृह याआधी टार्गेट झालेले आहे. सध्या विचित्र घटना घडत आहेत, शत्रूंनी जी मजल मारली आहे ती भयानक आहे. ज्या पातळीवर टीका सुरू आहे त्या अनुषंगाने खुप काही नियोजित घडतंय हे मात्र नक्की आहे.
राजकीय परिस्तिथी बदलत आहे. बदलाच चित्र दिसत आहे. नव्या वाटा निर्माण होत आहेत. नवनिर्मितीच्या घडामोडी वेग घेत आहेत आणि अशा स्थितीत सुनियोजित कट करून हल्ले होत आहेत.
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी राजगृहाच्या सुरक्षेत वाढ करण्याची व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. ज्या स्तरावर हे सुरू आहे त्याचा पर्दाफाश होण गरजेचं आहे. नेतृत्वाची सुरू असलेली स्पर्धा कोणत्याही स्तराला जाईल हे नाकारता येत नाही असे त्यांनी आपले मत मांडले आहे.