चळवळ
राज्यपाल नावाचं बुजगावण आठ दिवसात महाराष्ट्रात हद्दपार करा अन्यथा महाराजांचा फोटो घेऊन आलोच!

रायगड : परळी येते संविधान गौरव सभा संपन्न झाली यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल तीव्र शब्दात इशारा दिला!
त्यांनी सांगितले की शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे. काळ टोपीवाले शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी सोबत करत आहे. नितीन गडकरी ने चरबी काढली पोटाची कुठे नितीन गडकरी आणि कुठे महाराज… राज्यपाल नावाचं बुजगावणे जर आठ दिवसात महाराष्ट्रातून हद्दपार केलं नाही तर हा फकड्या महाराजांचा फोटो घेऊन राज भवना वर आल्याशिवाय राहणार नाही. याद राखा सत्तेसाठी गांडीत शेपूट घालून बसणारी आम्ही आऊलाद नाहीत. आम्ही मावळे आणि भीमसैनिक आहोत. अवमान खपून घेणार नाहीत या शब्दात त्यांनी भूमिका मांडली आणि एकच टाळ्यांचा गडगडाट झाला.