शिवशक्ती सोबत भीमशक्ती जोडण्या आधी ते “भिडे” च काय करणार याचा खुलासा घ्या!

शिवशक्ती – भीमशक्ती ऐक्य सध्या गाजत आहे. लोकांमध्ये याची वेगवेगळी चर्चा आहे. अचानक निळा झेंडा हातात असलेल्या पक्षांना महत्व आलेले आहे. शिवसेना फुटितून नवे रस्ते खुले झालेत. नवक्याना अचानक मिडियात गाजायला लागले आहेत.
भीमा कोरेगाव हल्ला झाला त्यातील अनेक आरोपी शिवसेनेशी निगडित आहे. सगळं बाजूला सारून वाटाघाटी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय अस्पृश्यता नसते. त्या अनुषंगाने हे खेळ सुरू आहेत.
ऑल इंडिया पँथर सेना विचारत आहे की, खुशाल एकत्र या पण भिडे च काय करणार याचा शिवसेनेनी खुलासा करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भिडे ला मुख्यमंत्री झाल्यावर भेटले. त्यांचं नातं काय? त्या नात्याच्या हिंदुत्वाला काय नाव देणार? भिडेच हिंदुत्व मान्य आहे का? आणि आम्ही कधीच भिडे ला भेटणार नाहीत असं पत्रक उद्धव ठाकरे संजय राऊत काढणार आहेत का?
अशा प्रश्न ऑल इंडिया पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी विचारला आहे!