चळवळ

शासकीय शाळेत सरस्वती चे समर्थन हा संविधानाचा अवमान – दिपक केदार

मुंबई : छगन भुजबळ यांनी शाळेतून सरस्वती हटवून सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे फोटो लावण्याचे मत व्यक्त केले. एवढंच नाही 3% साठी शिक्षण होतं त्यांची ती देवी आहे. बहुजन ज्यांच्या मुळे शिक्षण मिळाले त्या महापुरुषांचे फोटो लावण्याचे मत त्यांनी भाषणातून व्यक्त केले.

ज्यामुळे मीडिया याला वादग्रस्त विधान म्हणत आहे. हिंदु देवीचा अवमान झाला म्हणत ब्राह्मन महासंघाचे आनंद दवेनी छगन भुजबळ यांना माफी मागा म्हणत निषेध केला.

भाजपचे राम कदम हिंदु देवीचा अवमान होतोय, पेगविन सेना गप्प का? सरस्वती चा अवमान झाल्याचा कांगावा त्यांनी केला आहे. छगन भुजबळ वर त्यांनी सडकून टीका केली आहे.

यात ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी उडी घेत राम कदम यांचा खरपूस समाचार घेतला. दिपक केदार म्हणाले, “सरस्वती पुत्र राम कदम यांनी आधी सरस्वतीचे मूळ गाव शोधून काढावे त्या गावात भव्य स्मारक निर्माण करावे पण त्यासाठी त्यांचे गाव शोधावे लागेल. भाकडपणा खपवून घेतला जाणार नाही, शैक्षणिक क्षेत्रात हे थेर चालणार नाहीत. उठवारून शेळ्या हाकणाऱ्यानी आधी सरस्वतीचे गाव शोधावे. असा टोला देत.

त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे, सरस्वती शाळेतून हटणार नाही, म्हणनारे संविधानाचा अवमान करत आहेत. सरस्वतीला शिक्षणाची जननी मानणारे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नाकारत आहेत का? सरस्वतीचे समर्थन करताना ते या महापुरुषांना का विसरत आहेत?

असा सवाल त्यांनी उपस्थित करत संविधानात तरतूद आहे की जर शासनाच्या पैशातून शाळा चालत असेल तर तिथे धार्मिक सण साजरे करता येणार नाहीत, ठराविक धर्म लादता येणार नाही. सरस्वतीचा फोटो हे त्या तरतुदींचे उल्लंघन आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!