दिपक केदार यांची उद्या मुक्तिभूमी येवला येते अभिवादन जाहीर सभा

नाशिक : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांची उद्या मुक्तिभूमी येवला याठिकाणी जाहीर सभा होणार आहे.
१३ ऑक्टोबर 1935 ला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली होती. मुंबई इलाखा सभा आणि या सभेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ‘मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ ही हिंदुत्ववादी मनुवादी प्रवृत्तींना हादरून टाकणारी क्रांतीकारी घोषणा येथून केली होती त्यामुळे येवला मुक्तिभुमी म्हणून ओळखली जाऊ लागली.
धर्मांतर घोषणा स्थळाला अभिवादन करण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार येणार आहेत अभिवादन व जाहीर सभा होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1.30 च्या दरम्यान सभा होईल अशी माहिती नाशिक पँथर नेता करण संसारे, ॲड. कृष्णा दिवेकर यांनी दिली आहे. संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.