चळवळ
धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याची खामगाव येते जय्यत तयारी सुरू!

खामगाव : धम्मचक्र प्रवर्तन निमित्त ऑल इंडिया पँथर सेनेनी खामगाव येते जाहीर प्रबोधनाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. या सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार व राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल अन्विकर उपस्थित राहणार आहे.
खामगाव शहरात रात्रं दिवस कार्यकर्ते पोस्टर बॅनर लावत आहेत. कॉर्नर मीटिंग घेत आहेत, गावा गावात प्रचार करत आहेत. हा सोहळा दी. 30 ऑक्टोबर 2022 रोजी सायं. 5 ते रा. 10 पर्यंत होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा, नगरपरिषद मैदान, खामगाव, बुलढाणा येते लाखोंच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा अध्यक्ष प्रकाश धुंदळे यांनी केले आहे.